रायगड जिल्हा

रायगड जिल्हयाला ऐतिहासिक आणि भौगोलिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. जिल्हयाचा उत्तर -दक्षिण विस्तार १७० कि.मी. असून पूर्व - पश्चिम विस्तार ७० कि.मी. इतका आहे. अरबी समुद्राच्या तटांवर स्थित असलेला हा रायगड जिल्हा तिन्ही बाजूंनी हिरव्यागार नारळाच्या झाडांनी व उंच पर्वतांनी वेढलेला आहे.

रायगड जिल्हयाला शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून मान प्राप्त झाला आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणांनी हया भूमिला स्पर्श केलेला आहे. हया अतुलनीय जिल्हयात अजिक्य असा मुरुड जंजिरा किल्ला स्थित आहे. जवळ-जवळ १० छोटे मोठे किल्ले असलेल्या हया रायगड जिल्हयाचे विभाजन १५ तालुक्यांमध्ये केलेले आहे.

“दक्षिण काशी“ म्हणून संबोधले जाणारे हरिहरेश्वर हे ठिकाण रायगडात स्थित आहे. सी. डी. देशमुख व स्वर्गवासी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांसारख्या थोर पुरुषांनी रायगडात जन्म घेतला आहे. आचार्य विनोबा भावे यांचा जन्म गागोदे गावात झाला आहे. या प्रकारे रायगडाला सामाजिक पाश्र्वभूमी देखील लाभली आहे.

औद्योगिक क्षेत्रातही रायगड प्रगती पथावर असून येथील अलिबाग, पनवेल, महाड, उरण तालुक्यांमध्ये हजारो कोटींची औद्योगिक गुंतवणूक आहे. रायगड जिल्हा हा मुंबई लगतचा कोकणातील औद्योगिक जिल्हा असल्याकारणाने भारताच्या कानाकोपर्‍यातून उदरनिर्वाहासाठी येथे जनता स्थित झाली आहे.

रायगड जिल्हयाला जवळ-जवळ १० कि.मी.चा सागरी किनारा लाभल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी सतत असते. रायगड जिल्हयात मासेमारीमुळे मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. शिवाय पर्यटनामुळे येथील अनेक स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.

दृष्टिक्षेपात रायगड जिल्हा
ओळख जिल्ह्याचे नाव  रायगड  
  जिल्हा मुख्यालय  अलिबाग   
भौगोलिक तपशील जिल्हा क्षेत्र (चौ. किमी)  ७,१५२ (चौ. किमी) 
  किनारपट्टीची लांबी  १२२ किमी  
तालुका स्तर तपशील पंचायत समित्यांची संख्या  15
ग्रामीण स्तर तपशील एकूण ग्रामपंचायतींची संख्या  810
  एकूण गावांची संख्या  1932
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची एकूण संख्या  2603
  खाजगी माध्यमिक शाळांची एकूण संख्या  662
  एकूण अंगणवाड्यांची संख्या  3255
  प्राथमिक आरोग्य केंद्रांची एकूण संख्या  54
  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची एकूण संख्या  288
  पशुवैद्यकीय दवाखान्याची एकूण संख्या  100
कर्मचारी संख्याबळ जिल्हा परिषद एकूण कर्मचाऱ्यांची संख्या  11246
लोक संख्या विषयक तपशील ग्रामीण  1664005
  शहरी   970195
  एकूण 2634200
  पुरुष 1344345
  स्त्री 1289855
  लोकसंख्येची घनता  368
  लिंग गुणोत्तर  959
  लिंग गुणोत्तर (०-६)  935
  अनुसूचित जमातीची लोकसंख्या  305125
  अनुसूचित जातीची लोकसंख्या  134952
  बीपीएल कुटुंबे  114656
  मानवी विकास निर्देशांक  0.759
  दरडोई उत्पन्न  132607
  साक्षरता पुरुष  0.89
  साक्षरता स्त्री  0.77