ई गव्हर्नन्स

महाराष्ट्र शासनाच्या ई गव्हर्नन्स धोरणाच्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद रायगडतर्फे कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयीन स्तरावर विविध उपाय योजना केल्या असुन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली सामान्य प्रशासन विभागात माहीती व तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच शासनाच्या ई गव्हर्नन्स धोरणानुसार जिल्हा परिषदेत खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

 

ग्रामपंचायत स्तरावर दिल्या जाणा-या सेवा

 

G2C (Government to citizen) सेवा:

१.नमुना ८ असेसमेंट दाखला- नमुना ८ मध्ये नागरिकाची नोंद असावी व त्याने विहित नमुन्यात 

ग्रामपंचायत ला अर्ज करावा व सोबत आधार कार्ड जोडावे.

२. दारिद्र्य रेषेखालील दाखला- दारिद्र्य रेषेमध्ये नागरिकाचे नाव असावे व त्याने विहित नमुन्यात 

ग्रामपंचायत ला अर्ज करावा व सोबत आधार कार्ड जोडावे.

३.जन्म दाखला- जन्माची नोंद ग्रामपंचायत ला असावी व त्याने विहित नमुन्यात ग्रामपंचायत ला 

अर्ज करावा व सोबत आधार कार्ड जोडावे.

४.मृत्यू दाखला- मृत्यूची नोंद ग्रामपंचायत ला असावी व त्याने विहित नमुन्यात ग्रामपंचायत ला 

अर्ज करावासोबत आधार कार्ड जोडावे.

५.विवाह दाखला- विवाहाची नोंद ग्रामपंचायत ला असावी व त्याने विहित नमुन्यात ग्रामपंचायत

ला अर्ज करावासोबत आधार कार्ड जोडावे.

६.थकबाकी नसल्याचा दाखला- नागरिकाने त्याने विहित नमुन्यात ग्रामपंचायत ला अर्ज करावा व 

सोबत आधार कार्ड जोडावे.

७.निराधार असले बाबतचा दाखला- कुटुंब प्रमुखाचा मृत्यू दाखला विहित नमुन्यात ग्रामपंचायत ला 

अर्ज करावा व सोबत आधार कार्ड जोडावे.

 

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ४२० सेवा ऑनलाईनपध्दतीने महाऑनलाईनने विकसीत केलेल्या प्रणालीमार्फत (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) दिल्या जातात. या साठी  नागरिकाने आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन या सेवांसाठी विहित नमुन्यात मागणी करावी.

 

B2C (Business to Citizen)सेवा:

  1. मोबाईलरिचार्ज

  2. टी.व्ही. रिचार्ज

  3. इन्शुरन्स भरणा

  4. रेल्वे तिकीट बुकिंग

  5. लाईट बिल भरणा

  6. गॅस बुकिंग

  7. बँक सेवा

  8. PANकार्ड  सेवा 

* जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ- सामान्य जनतेला जिल्हा परिषदे तर्फे राबविण्यात येणा-या शासनाच्या  विविध योजनांची सन्मा पदाधिकारी तसेच विभागांची माहिती विभाग प्रमुख, माहिती अधिकार व तत्सम आवश्यक माहिती https://zpraigad.in उपलब्ध वर करुन देण्यात आलेली आहे.


अमृत ग्राम प्रणाली