रायगड
जिल्ह्यातील बीच, समुद्र किनारे
अलिबागपासून
१२ कि.मी. अंतरावर इतर किनार्याप्रमाणेच निसर्गाचे
वरदान घेऊन किहीमचा रम्य किनारा निसर्गप्रेमिकांचे
मन रिझवत आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावरील चढी किहीम फाटयावर
उतरल्यावर पश्चमेकडे जाणारा रस्ता हा किहीम गावातून
समुद्रकिनारी जातो. छायाचित्रणासाठी आपणांस अनेक नैसर्गक
सौंदर्यस्थळे या किनार्यावर आढळतील. नारळीर्पोफळींची
दाट वनश्री आणि आकाशाला गवसणी घालणारी सुरूची झाडे
किनार्याची शोभागिुणीत करतात. त्यामुळेच या किनार्यावर
पर्यटकांची खूप गर्दी असते. येथील सृष्टीसौंदर्यात
आगळीच भर टाकणारा स्वच्छ नितळ अथांग सागर पर्यटकांना
कुठल्याही ऋतुत आग्रहाचे निमंत्रण देत असतो.
या
समुद्रकिनारी महाराष्ट पर्यटन विकास महामंडळातर्फे
पर्यटकांसाठी तंबुंची सोय करण्यात आलेली आहे. निसर्गाच्या
सान्निध्यात माडांच्या गर्द झाडीत समुद्राच्या कुशीत
रहाण्याची मौज काही औरच मात्र ही मौज अनुभवयाची ती
फक्त उन्हाळा किंवा हिवाळयातच. पावसाळयात तंबूत रहाण्याची
मजा लुटता येत नाही. परुतु वर्षाचे बाराही महिने किहीम
गावात अनेक ठिकाणी घरगुती रहाण्याची तसेच भोजनाची व्यवस्था
होते.
अलिबाग-खेदंडा
रोडवर अलिबाग स्थानकापासून सुमारे ५ किमी. अंतरावर
आक्षीचा किनारा आहे. येथे जाण्यासाठी आक्षी स्थानकाजवळ
असलेल्या स्तंभाजवळून आतमध्ये एक ते दीड किमी. जावे
लागते. स्वतचे वाहन असल्यास थेट किनार्यापर्यंत आपण
जाऊ शकता. किनारा स्वच्छ सुंदर प्रदुषणविरहित असून
सुरूच्या बनांनी नटलेला आहे. या किनार्यावरून आपल्याला
अलिबाग बीचचे तसेच तसेच कुलाबा किल्ल्याचे दर्शन घडते.
अलिबाग
एस.टी. स्थानकापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर पश्चमेस
साधारण ४-५ किमी. लांबीचा वालुकामय किनारा आहे. मारूती
नाक्यावरून थेट पश्चमेला किनार्याकडे जाणारा रस्ताही
तितका स्वच्छ व हवेशीर. या रस्त्यावरून तुम्ही जेव्हा
किनार्याकडे जाल तेव्हा वाटेत सार्वजनिक वाचनालय व
जिल्हा ग्रंथालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिस, जिल्हा
रूग्णालय, शासकीय विश्रामगृह, जिल्हा परिषद पत्रकार
भवन ही अलिबागमधील महत्वाची ठिकाणे येतील. उजव्या हाताला
क्रिडाभुवनचे प्रशस्त मैदान लागेल. किनार्यावर पोहोचल्यावर
ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याचे दर्शन होईल.
संपूर्ण
किल्ल्याचे अवलोकन करीत मऊशार वाळूतून चालत असता किनार्यावरील
सुरूची उंचच उंच झाडे त्यांना साथ देणारी नारळाच्या
झाडांची शोभा आपले मन खचितच मोहून टाकेल यात शंका नाही.
किनार्यावरील खाजगी व सरकारी बंगल्यामुळे हा किनारा
अधिकच खुलून दिसतो. शिवाय किनार्यावर शहाळयाचे पाणी
आईस्क्रम भेळपूरी पॅटीस इ. खादयपदार्थ विक्रेते क्षुधाशांतीसाठी
आहेतच. सागरलाटांच्या खळाळत्या नादसौदर्याचा अनुभव
येथेच घ्यावा. जसजसा सूर्य अस्तास लावू लागेल तेव्हा
जरा क्षितीजाकडे नजर टाका व आकाशाच्या रंगपटावर उधळणार्या
सप्तरंगाची आतिषबाजी पहा. अशावेळी अंधुक प्रकाशात समोरील
किल्ल्याचा गगनभेदी दरारा आपणांस हळूच इतिहासात ओढू
लागेल. वाळूतून लगबगीने फले टाकीत पाठीवर जाळे सांभाळीत
ओल्या कपडयांची पर्वा न करता आपल्या मस्तीत गात गात
घरी निघालेल्या मच्छमार बांधवांच्या कोळीगीताला साथ
देण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही.
अलिबाग
एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्दीस आल्यापासून
अलिबाग बीचवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. जरी वर्दळ
असली तरी आवाजाचे प्रदूषण नाही. म्हणूनच ही बीच म्हणजे
अलिबागचे एक वैशिष्टय आहे.
काशिद बीच -
मुरूडच्या
उत्तरेस जवळपास १८ किमी. अंतरावर गोव्यामधील बीचची
आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिदचा
समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
काशिदच्या
किनार्यावरील सुरूंच्या नयनमनोहरी बागांतून विश्रांतीस
थांबलेल्या पर्यटकांची गर्दी पाहूनच या स्थानाचे महत्व
लक्षात येते. विकएंडला शेकडो पर्यटक इथे समुद्रस्नानासाठी
जमतात. मॉडेंलिंग टि.व्ही. सिरीयल व सिनेमांचे शूटींग
येथे सातत्याने होत असते.
समुद्रकिनारी
छोटया स्टॉलपासून परिपूर्ण सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस्
यामुळे काशिद बीच पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे.
येथे
जाण्यासाठी अलिबाग एस.टी. स्थानाकापासून अलिबाग-रेवदंडा
रस्त्यावर ७ किमी. अंतरावर असणार्या नागांव ऑफीस येथे
उतराव लागते. तेथील शिवछत्रपतीच्या पुतळयाजवळील रस्त्याने
गेल्यावर दोन-अडीच किमी. अंतरावर हे बीच आहे. या बीचला
साताड बंदर असेही म्हणतात. येथील वैशिष्टय म्हणजे किनार्यावरील
एका रांगेत असणारी डौलदारपणे डुलणारी सुरूची झाडे व
रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा त्यावर फेसाळणार्या
अथांग समुद्राच्या पांढर्याशुभ्र लाटा पर्यटकांना
फारच मोहीत करतात. येथे पर्यटकांसाठी नाष्टा जेवण तसेच
निवासाच्या भरपूर सोयी आहेत. पर्यटक या किनार्यावर
इतके खुश आहेत कि महाराष्ट शासनाने पर्यटकांच्या ष्टीकोनातून
या किनार्याकडे विकासाकडे आपले लक्ष केंद्रीत केले
आहे. पर्यटकांना मोहविणार्या या निसर्गसंपन्न किनार्याला
जरूर भेट द्या.
रेंवदंडा बंदर -
अलिबाग
स्थानकापासून १७ किमी. अंतरावर असणारे हे ऐतिहासिक बंदर
आहे. याच ठिकाणी रोहयाहून येणार्या कुंडलिका नदीचा अरबी
समुद्राशी संगम होऊन खाडी तयार झाली आहे. रेवदंडा बंदराच्या
पलिकडे साळाव गावापासून मुरूड तालुक्याची हद्द सुरू हते.
या खाडीवर बांधलेला मुरूड आणि अलिबाग तालुके जोडणारा वाहतुकीच्या
संदर्भात उपयुक्त ठरणारा साळाव खाडी पूल १९८६ पासून वाहतुकीस
खुला झाला आहे. या पुलावरून मुद्दामहून फेरफटका मारा. सभोवतालच्या
नैसर्गिक परिसराची अजब किमया तुम्हाला गुंग करील. साळावकडील
टोकावरून संपूर्ण रेवदंडाचा परिसर सागराचे विलोभनीय दर्शन
खाडीतील गलबतांची वहातुक तसेच डाव्या बाजूला दूरवर दिसणारे
विक्रम इस्पात कंपनी तर उजव्या बाजूस या पुलाजवळच विक्रम
इस्पात कंपनीची जेटी दिसते.
रेवदंडा बंदराजवळच एस.टी. स्थानक तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचे स्थानक आहे. एस.टी.
स्थानकाच्या मागील बाजूस खाडीत छोटासा धक्का पकटी आहे.
या भागात मासेमारीचा व्यवसाय जोरात चालतो. मासे पकडून
आणलेली गलबते होडया या धक्क्याजवळच थांबतात. या ठिकाणी
ताज्या मासळीची खरेदी-विक्री होते.
अलिबाग
एस्. टी. स्थानकापासून सुमारे २३ किमी. अंतरावरील हे
बंदर मुंबई-रेवस वहातुकीमुळे एक महत्त्वाचे बंदर ठरले
आहे. मुंबईहून लाचने येणारे प्रवासी तसेच उरणहून करंजामार्गे
तरीने येणार्या प्रवाशांची वर्दळ नेहमीच या बंदरावर
असते. बंदराभोवतालचा सारा भूप्रदेश नैसर्गक सौंदर्याने
नटलेला आहे. धक्कयावर उभे राहिले असता समोर करंजार्उरणचा
किनारा उंच भागातील छोटे-छोटे बंगले मच्छमार बांधवांची
गलबते तसेच लाटांवर डुलणार्या होडयांची विलोभनीय दृष्ये
नजरेस पडतात. हवामान स्वच्छ असल्यास मुंबईतील गगनचुंबी
इमारतींचे दर्शनही खेस धक्कयावरून होते. या बंदराच्या
परिसरात फिरताना एक वेगळाच आनंद मिळतो. धक्कयापासून
जवळच एस्. टी. स्थानक आहे तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचीही
उत्तम सोय आहे.
अलिबाग
एस्.टी. स्थानकापासून सुमारे १९ किमी. अंतरावर हे एक
निसर्गसंपन्न बंदर आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावर मांडवा
फाटयावर उतरून बंदराकडे जावे लागते. इतर बंदरांप्रमाणे
नैसर्गक सृष्टीसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे हे आगळेवेगळे
असे पिकनिक पॉईंट झाले आहे.
या
बंदराच्या धक्कयाला मुंबईहून (गेट वे ऑफ इंडिया ) येणार्या
पी.एन्.पी. सर्व्हसेस कॅटमरान अजंठा कॅटमरान यांच्या
स्पीडबोट तसेच अजंठा सर्व्हीस अलसिद्दीक मोटार बोट
लागतात. मांडव्याच्या समुद्रकिनारी अनेक धनिक लोकांचे
बंगले तसेच फार्महाऊस आहेत.